व्यापार प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद

राज्यातील कंपन्यांनी नोंदविला उत्तम सहभाग

चीन, नेदरलॅंड, दक्षिण आफ्रिकेचा सहभाग

यंदा सुरक्षा व्यवस्थाही अधिक कडक ठेवण्यात आली असून कोणत्याही धोक्‍यापासून बचाव करण्याची तयारी ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. अफगाणिस्तान, चीन, किरगिस्तान, इराण, म्यानमार, नेपाळ, नेदरलॅंडस्‌, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, थायलंड, तुर्कस्तान, टय़ूनिशिया, व्हिएतनाम व संयुक्त अरब अमिरात या देशांचे प्रतिनिधी आणि उद्योजक यात भाग घेत आहेत.

नवी दिल्ली – दिल्लीत दरवर्षी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाला शानदार प्रारंभ करण्यात आला आहे. येथील प्रगती मैदान या स्थळी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून यंदा त्याला विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे. विविध कंपन्यांच्या व्यापारी गाळयांच्या संख्येत वाढ झाली असून जागा अपुरी पडत असल्याची तक्रार आहे.

-Ads-

हे प्रदर्शन 14 दिवस चालणार असून त्यात अनेक देशी आणि जागतिक कंपन्यांनी भाग घेतला आहे. यावेळी आयोजकांना प्रदर्शनाची तयारी करताना बऱ्य़ाच अडचणींचा सामना करावा लागला. प्रचंड प्रदूषणामुळे दिल्लीत सर्व प्रकारची बांधकामे थांबविण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यामुळे प्रदर्शनाच्या आयोजकांनाही गाळयांची बांधकामे थांबवावी लागली. परिणामी, बरीच तयारी ऐनवेळी करावी लागली, असा दावा आयोजकांनी केला.

या प्रदर्शनात भारतातील प्रत्येक राज्यातील व्यापारी आणि उद्योजक भाग घेतात. यावेळी भारताचा भागीदार देश अफगाणिस्तानच्या काही कंपन्यांनीही आपली उत्पादने सादर केली आहेत. राज्य सरकारे आणि सार्वजनिक उद्योग यांचे 800 हून अधिक कक्ष आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)