सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश ‘दीपक मिश्रा’ आज निवृत्त

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सोमवारी निवृत्त होण्याआधी आज शेवटचे न्यायालयीन कामकाज पाहिले. शेवटच्या दिवसाच्या कामकाजावेळी त्याच्या सोबत न्यायमूर्ति रंजन गोगोई उपस्थित होते. न्यायमूर्ति रंजन गोगोई दीपक मिश्रा त्यांच्यानंतर हे पद संभाळणार आहेत.

मागील दहा दिवसामध्ये आधार कार्ड, अयोध्या प्रकरण, एससी-एसटी पदोन्नती आरक्षण, व्याभिचार प्रकरण, न्यायालयीन युक्तीवादाचं थेट प्रक्षेपण, दोषी नेत्यांना निवडणूक लढवण्यास बंदी,शबरीमाला मंदिरात महिला प्रवेश अशा अनेक महत्त्वपूर्ण प्रकरणांवर निकाल देणाऱ्या खंडपीठ व घटनापीठांचे अध्यक्षता करणारे दीपक मिश्रा हे आज ‘फक्त 25 मिनिटे’ चाललेल्या न्यायालयीन कामकाजादरम्यान भावूक झाल्याचे दिसून आले.

कामकाजाच्या शेवटी जेव्हा एका वकिलाने तुम जियो हजारों साल गाणे म्हणणे सुरू केले तेव्हा न्यायमूर्ति मिश्रा यांनी त्यांच्या अनोख्या शैलीत वकिलाला थांबवले. त्यांनी म्हटले , ”वर्तमान में मैं अपने दिल से बोल रहा हूं… अपने दिमाग से मैं शाम के वक्त बोलूंगा” !

सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती रंजन गोगोई हे देशाचे भावी सरन्यायाधीश  म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. न्यायमूर्ती गोगोई हे 3 ऑक्टोबर रोजी पदाची शपथ घेतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)