नवीन ब्रँड ओळख आमच्यासाठी एक महत्वपूर्ण रणनीति-आकाश गुप्ता

कोल्हापूर  – प्रीमियर प्लसची नवीन ब्रँड ओळख नवीन भविष्यातील उत्साह, नवीन सामर्थ्य आणि गतिशीलता, तसेच आधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन, विश्वासार्ह डिझाइनचे आश्वासन आणि उत्तम गुणवत्ता हे सुद्धा ही ब्रॅण्ड सूचित करतो.नवीन ब्रँड ओळख आमच्यासाठी एक महत्वपूर्ण रणनीति असे प्रतिपादन व्यवस्थापकीय संचालक आकाश गुप्ता यांनी केलंय

ऑटोमोटिव्हच्या उद्योगात आपली स्थिती मजबूत करण्यासाठी आणि वाढविण्यासाठी एएमजी कॉर्पोरेशनने आपला फ्लॅगशिप ब्रॅण्ड ‘प्रीमियर प्लस’ चा लोगो नव्या रूपाने सर्वांन समोर आणला आहे. प्रिमिअर प्लस ची खासियत सस्पेन्शन व एनव्हीएच अँप्लिकेशन्स मधील रबर व मेटल-टू-रबर बोन्डेड कॉम्पोनन्ट ही आहे. आणि हे प्रोडक्ट्स ३ व्हीलर, पॅसेंजर कार आणि लाइट कमर्शियल व्हेइकल या सेगमेंट्स मध्ये वापरले जातात.

नवीन ब्रॅण्ड ‘प्रीमियर प्लस’ चे वैशिष्ठपूर्ण डिझाईनमुळे ब्रॅण्ड त्याचे मार्केटमध्ये विश्वासार्थ वाढी साठी मदत होणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ऑटो कॉम्पोनन्ट व वेगळे ब्रॅण्डच्या ऑफरमुळे मार्केटमध्ये उत्तम अनुभवी व विश्वासार्थ याची योग्यसांगड बघायला मिळणार आहे. प्रीमियर प्लस हा सिम्बॉल व्यवसाय वृद्धिगत होण्यासाठी सगळे निकष पूर्ण करतो.

आधीच्या लोगो मधून लाल आणि काळा रंग तसाच घेण्यात आला आले असून लाल रंग हा अधिक फ्रेश स्वरुपात वापरला असल्यामुळे ब्रॅण्डचा लक्षवेधीपणा तसाच कायम राहून अजून अधोरेखित होतो. लाल रंग हा उर्जेचे व जिद्दीचे प्रतिक आहेज्याद्वारे ब्रँड पुढे जाईल. एकूणच, प्रीमियर प्लसची नवीन ब्रँड ओळख नवीन भविष्यातील उत्साह, नवीन सामर्थ्य आणि गतिशीलता, तसेच आधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन, विश्वासार्ह डिझाइनचे आश्वासन आणि उत्तम गुणवत्ता हे सुद्धा ही ब्रॅण्ड सूचित करतो. ब्रँडच्या नवीन स्वरूपाचे कंपनीच्या वितरक, विक्रेते व भागीदारांकडून उत्तमरित्या स्वागत देखील करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)