न्यू आर्टसच्या विद्यार्थ्यांनी ज्युदो स्पर्धेत पटकाविली ६ सुवर्ण, १ रौप्य पदक

नगर – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पेमराज सारडा महाविद्यालयात नुकतेच झालेल्या आंतर महाविद्यालय ज्युदो स्पर्धेत न्यू आर्टस, कॉमर्स ऍण्ड सायन्स कॉलेजच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत 6 सुवर्ण तर एक रौप्य पदक पटकाविले. तसेच विजेतेपदाचा बहुमान देखील न्यू आर्टस महाविद्यालयाच्या मुली व मुलांच्या संघास मिळाला आहे.

मुलीं मध्ये प्रियंका डोंगरे (48 किलो वजनगट), प्रतिभा डोंगरे (52 किलो वजनगट), शिल्पा म्हेत्रे (70 किलो वजनगट), तसेच मुलांमध्ये आदित्य सैद (73 किलो वजनगट), मयुर जपे (79 किलो वजनगट), शुभम दातरंगे (100 किलो वजनगट) यांनी सुवर्ण पदक पटकाविले. तर आदित्य कुलकर्णी (100 किलो वजनगटात) रौप्य पदकाची कमाई केली. सदर स्पर्धेत जिल्ह्यातील महाविद्यालयीन खेळाडूंनी उत्सफुर्त सहभाग नोंदवला होता.

सुवर्ण पदक पटकाविणाऱ्या महाविद्यालयातील खेळाडूंची नाशिक येथे होणाऱ्या आंतर विभागीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंना क्रीडा विभागाचे डॉ.शरद मगर, धनंजय लाटे, धन्यकुमार हराळ, सुधाकर सुंबे, प्रा.संजय धोपावकर, नगर तालुका तालिम सेवा सघाचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी.डी. खानदेशी, सहसचिव ऍड.विश्‍वासराव आठरे, खजिनदार डॉ.विवेक भापकर, प्राचार्य भास्करराव झावरे आदिंनी अभिनंदन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)