उत्तरपत्रिका खरेदी घोटाळा: अभाविपचे मॅनेजमेंट काँसिल समोर निदर्शने सुरू

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने नियम धाब्यावर बसून खरेदी केलेल्या नवीन उत्तरपत्रिका घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करावी व समितीचा अहवाल येईपर्यंत संचालकांना सक्तीच्या रजेवर पाठवावेत, या मागणीसाठी अभाविपचे दुपारी १२.३० पासून विद्यापीठ फोर्ट कॅम्पस मध्ये आंदोलन सुरू आहे. दरम्यान, अभाविपची कुलगुरू सोबत भेट झाली असून अभाविप मागण्यांवर ठाम आहे.

जोपर्यंत विद्यापीठ लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन चालूच राहील, असे अभाविप कोंकण प्रदेश मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी सांगितले.

अभाविपच्या मागण्या

  • विद्यापीठाच्या नियमांची पायामल्ली करत विनापरवानगी छापण्यात आलेल्या उत्तरपत्रिका प्रकरणाची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करावी.
  • वरील प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत आताचे परीक्षा विभाग संचालक यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे.
  • रत्नागिरी येथिल फिनोलेक्स महाविद्यालयातील बनावट गुणपत्रिका तयार केलेल्या प्रकरणाची विद्यापीठामार्फत चौकशी व्हावी.
  •  गेल्या सत्रातील निकालानंतर केलेल्या पुनर्मूल्यांकन प्रक्रिये दरम्यान झालेल्या जवळपास ३५ हजार विद्यार्थ्यांच्या निकालात बदल झाला तरी पेपर तपासणी दरम्यान झालेल्या चुकांची चौकशी करण्यात यावी.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)