उत्तर प्रदेशात कॉंग्रेसचा दीर्घपल्ल्याचा कार्यक्रम

लखनौ – प्रियांका गांधी यांच्या सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा झाल्यानंतर देशभरातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच लोकसभा आणि विधानभेतील जागांच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये प्रियांका गांधी यांच्या आगमनामुळे पक्षाला गतवैभव मिळेल, अशी कॉंग्रेसला अपेक्षा आहे.

आता राज्यातील आपल्या पारंपरिक सवर्ण मतदारांना पुन्हा एकदा पक्षाकडे खेचण्यासाठी मोठी खेळी खेळण्याची तयारी कॉंग्रेसने केली असून, 2022 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून प्रियांका गांधी यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्‍यता आहे.

प्रियांका गांधी यांचा सक्रिय राजकारणातील प्रवेश हा लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झाला असल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात 2022 मध्ये राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर पक्षाची नजर आहे. तसेच या निवडणुकीसाठी प्रियांका यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार बनवण्यासाठी पक्ष प्रयत्नशील आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)