महावीर फोगाट ‘जननायक जनता’ पार्टीत सामील

चंडीगड – ओमप्रकाश चौटाला यांचे नातू दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टी (जेजेपी) मध्ये प्रसिद्ध कुस्ती प्रशिक्षक महावीर फोगाट सहभागी झाले आहेत. पक्षाच्या क्रीडा विभागाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून महावीर फोगाट यांची नियुक्ती झाली आहे.

महावीर फोगाट हे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू गीता फोगाट व बबिता फोगाट यांचे वडील आहेत. चार मुलींचे वडील असलेल्या महावीर फोगाट यांना आपल्या मुलींना आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती खेळवण्याची इच्छा होती. हरियाना सारख्या महिलांच्या बाबतीत अतिशय नकारात्मक दृष्टिकोन असलेल्या राज्यात महावीर फोगाट यांना अत्यंत प्रतिकुलतेला सामोरे जावे लागले होते. अशाही परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलींना राष्ट्रीय स्तरावरच नव्हे तर ऑलिंपिक पर्यंत नेले. त्यांच्या जीवनावर आमिर खानने “दंगल’ काढला होता.

ओमप्रकाश चौटाला यांनी आपले नातू दुष्यंत चौटाला यांना इंडियन नॅशनल लोकदल पक्षातून नोव्हेंबर महिन्यात बाहेर काढले होते. त्यानंतर दुष्यंत चौटाला यांनी जननायक जनता पार्टी (जेजेपी) ची स्थापना केली आहे .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)