विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी नेवासा तालुक्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

नेवासाफाटा – देशाचा स्वातंत्र्यदिन नेवासा तालुक्यातील गावोगावी विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रत्येक गावातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी देशभक्तीपर गीते गाण्यात आली.

नेवासा तालुक्याचे तहसीलदार उमेश पाटील यांच्या हस्ते तहसील कार्यालयातील बाहेरील प्रांगणात तालुक्याचा मुख्य ध्वजारोहण आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात पार पडला तसेच होमगार्ड कार्यालयाचे व पोलीस स्टेशन प्रांगणातील ध्वजारोहण ही तहसीलदार उमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

-Ads-

पंचायत समितीचे ध्वजारोहण अनंत परदेशी यांच्या हस्ते तर नगरपंचायतचे व मारुतीनगर शाळेचे  ध्वजारोहण नगराध्यक्षा सौ.संगिता बर्डे यांच्या हस्ते पार पडले.नेवासा शहरातील तलाठी कार्यालय,नेवासा खुर्द सोसायटी,श्रीराम ग्राहक भांडार,वडार सोसायटीचे ध्वजारोहण निवासी नायब तहसीलदार ज्योती प्रकाश जायकर यांच्या हस्ते पार पडले.जिल्हा परिषद सेमी इंग्लिश नेवासा खुर्द मुलांच्या शाळेचे  ध्वजारोहण नगरसेविका सौ.शालिनीताई सुखधान यांच्या हस्ते पार पडले.

नेवासा शहरातील जिल्हा परिषद मुलींची शाळा, ज्ञानोदय इंग्लिश स्कूल,सौ.सुंदरबाई कन्या विद्यालय, बदामबाई विद्यालय,आदर्श विद्यालय,विवेकानंद जि. प.शाळा येथे ही ध्वजारोहण उत्साहाच्या वातावरणात पार पडला.ठीकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर गीते नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी कलागुणांचे दर्शन घडविले.

यावेळी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला नगराध्यक्ष सौ.संगिता बर्डे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील,दत्तात्रय बर्डे,नगरसेवक,गफूरभाई बागवान, रामभाऊ जगताप, सोसायटीचे अध्यक्ष दिलीपराव जामदार,संजय सुखधान,भास्करराव कणगरे, अंबादास ईरले, नगरसेवक संदीप बेहळे,फारूक आतार,सचिन नागपुरे,सचिन वडागळे,दिनेश व्यवहारे, रणजित सोनवणे,नरसु लष्करे,भारत डोकडे, गणपतराव मोरे, रम्हूभाई पठाण,शांताराम गायके, प्रमोद पोतदार, कामगार तलाठी बद्री कमानदार, मंडलाधिकारी गाडे सर,यांच्या सह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)