न्यूरोबिक्‍स आणि त्याचे फायदे

डॉ. स्वप्निल सुतार

प्रकाश आजकाल फारच विसराळू झाला आहे. आपण काय कोठे ठेवले याची त्याला आठवण राहात नाही. कधी कधी तर तो घरातून बाहेर पडतो आणि बाहेर पडल्यानंतर आपण काय आणायला किंवा कोणत्या कामासाठी बाहेर निघालो आहोत हे देखील तो विसरतो. अर्थात त्याला ते आठवते, पण बरेच उशिरा आठवते. कधी तो चष्मा कोठे ठेवला ते विसरतो आणि मग आंधळ्यासारखा शोधत बसतो.

काल असेच झाले. कपाटाची चावी आपण कोठे विसरलो हेच तो विसरून गेला. त्याच्या पत्नीने ती त्याला ठेवायला दिली होती आणि तिला आता कपाटातील तिचा नवीन ड्रेस हवा होता. मैत्रिणीच्या मुलीचा वाढदिवस होता, त्यासाठी तिला जायचे होते. त्यांचा गोंधळ चालू होता आणि मी नेमकी त्यावेळी तेथे गेले होते. प्रकाश म्हणाला, “बघ, मी कपाटाच्या किल्ल्या कुठेतरी ठेवल्या आहेत, मला आठवत नाही. काय करू. हे असे नेहमीच व्हायला लागले आहे.

मी म्हणाले, “अरे! आता वाढत्या वयानुसार अशा गोष्टी व्हायच्याच. त्यात काही नवीन नाही, हे असे अनेकांच्या बाबतीत होते. आपल्या सभोवतीही असे बरेच लोक आपण पाहू शकतो. हा रोग डिमेंशिया म्हणूनही ओळखला जातो. डिमेंशियामधील डी म्हणजे च्या शिवाय, च्या विना, अर्थाशिवाय? आणि ाशपींळर म्हणजे ब्रेन? डिमेन्शिया मेंदूची क्षमता कमी करते, स्मरणशक्ती कमी करते.

डिमेन्शिया झालेले लोक लोकांची नावे विसरतात. चेहरे विसरतात, आपण काय कामासाठी बाहेर पडलो हे विसरतात. सोप्या भाषेत आपण त्याला विसराळूपणा म्हणतो. यात वारंवार त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करण्याचा प्रकारही होतो.डिमेन्शिया झालेले बरेच लोक रस्त्यात भटकत असताना दिसतात. डिमेन्शिया झालेले लोक उदासीनतेचे बळी ठरतात, जी दिवसेंदिवस वाढत जाते. यामध्ये मेंदूचे कार्य अधिकाधिक खराब होते. एका आकडेवारीनुसार भारतातील चार दशलक्ष लोक डिमेन्शियाने ग्रस्त आहेत आणि त्यांची संख्या सतत वाढत आहे.
त्यातून बाहेर पडण्यासाठी मेंदूला कसरत आवश्‍यक आहे. त्यालाच न्यूरोबिक्‍स म्हणतात.

न्यूरोबिक्‍स कसे करावे :
उलटे खाली जाण्याचा प्रयत्न करा
सुडोकू किंवा चौरस कोडे सोडवा, सामान्य गणितीय गणनांचे गुणाकार करा.
काउंटडाउन, आरशात घड्याळ बघून वेळ काढा.
सकाळी व रात्रीही ब्रश करताना डाव्या हातात ब्रश धरा.
झश्ररू डीीेंश मधून मेंदूला चालना देणारे गेम्स डाऊनलोड करा आणि त्यांचा वापर करा. हे गेम्स मेंदूसाठी खूप चांगले असतात.
योग, ध्यान आणि पोषक आहार यांचा या बाबतीत मोठा फायदा होतो. त्याकडे लक्ष द्या. चांगले आणि कमीतकमी 6 ते 8 तास झोप घेणे आवश्‍यक आहे.

न्यूरोबिक्‍सचे फायदे:
न्यूरोबिक्‍समुक़े काही दिवसात आपल्याला खूप फरक जाणवू लागेल. स्मरणशक्ती वाढेल, मेंदूची क्षमता वाढेल. मानसिक वय वाढवण्याची प्रक्रिया कमी होईल. प्रत्येकाच्या मेंदूच्या आरोग्यासाठी न्यूरॉबिक्‍स करणे आवश्‍यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)