नेदरलँडमध्ये गायीच्या शेणापासून बनविला फॅशनेबल ड्रेस

नवी दिल्ली – गायीपासून मिळणारे शेण मानवासाठी सर्वच दृष्टीने फायदेशीर असते. गोबर कीटकनाशके, औषधे इत्यादी अनेक प्रकारे वापरात येत असते. पण तुम्ही कधी शेणापासून ड्रेस बनविल्याचे ऐकले आहे का? नाही ना. परंतु नेदरलँडमधील एका स्टार्ट अप कंपनीने गायीच्या शेणापासून फॅशनेबल ड्रेस बनविला आहे.

नेदरलँडमधील बायोआर्ट एक्स्पर्ट जलिता एसाइदी या स्टार्ट अप कंपनी चालवितात. त्यांनी गायीच्या शेणापासून कापड बनविण्याचा अनोखा शोध लावला आहे. एवढेच नव्हे तर गायीच्या शेणापासून प्लास्टिक आणि पेपरहि बनविण्यात आले आहेत. या इनोव्हेशनसाठी जलिता एसाइदी यांना चीवज वेंचर अॅन्ड एचएंडएम फाउंडेशनकडून ग्लोबल अवॉर्डने सन्मानित केले गेले आहे. दोन लाख डॉलर म्हणजेच १.४० कोटी त्यांना पुरस्कारस्वरूप मिळाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जलिता एसाइदी  यांनी काही वर्षांपूर्वीच ‘वन डच’ या नावाची कंपनी सुरु केली होती. यामध्ये त्यांनी ग्यीच्या शेणापासून कापड, पेपर, प्लास्टिक बनविण्याचे शोध लावले आहेत. एसाइदी सध्या १५ शेतकऱ्यांसोबत या प्रोजेक्ट वर काम करत आहे. त्या याचवर्षी औद्योगिक स्तरावर मॅन्योर रिफायनरी सुरु करणार आहेत.

याबद्दल बोलताना जलिता एसाइदी  म्हणता कि, आपण शेणाला वेस्ट मटेरियल समजतो. तसेच ते दुर्गंधीयुक्तही असते. परंतु कापड बनविण्याच्या सुरुवातीला वापरण्यात येणारे तेलही चांगले नसते. परंतु आम्ही यापासून ड्रेसेस बनविले आहेत. या प्रक्रीयेबद्दल बोलताना एसाइदी म्हणल्या कि, सेल्युलोज बनवण्याची प्रक्रिया केमिकल आणि मॅकेनिकल आहे. आपल्याला जे गोबर आणि गोमुत्र मिळत असते. त्यात ८० टक्के पाणी असते. पहिल्या टप्प्यात गोबरचा ओला आणि सुका भाग वेगळा केला जातो. यामध्ये जास्त करून मका आणि गवत असते. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, यामध्ये मिळालेला सेल्युलोज हाय-टेक्निकचा असतो.

दरम्यान, या नाविन्यपूर्ण संशोधनाचा जगाला आणि शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)