#HWC2018 : नेदरलॅंड्‌सकडून पराभवानंतर भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात

भुवनेश्‍वर – नेदरलॅंड्‌सविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात भारताला 1-2 असा पराभव स्वीकारावा लागल्याने भारताचे हॉकी विश्‍वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. पहिल्या सत्राची सुरुवात भारताने आक्रमक केली. नेदरलॅंडचा बचाव भेदत भारतीय खेळाडूंनी पेनल्टी एरियात प्रवेश केला.

पहिल्या मिनीटापासून घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे नेदरलॅंडचे खेळाडू दबावात गेले होते. 12 व्या मिनीटाला भारताने पेनल्टी कॉर्नवर गोल करण्याची संधीचा पुरेपूर फायदा उचलत आकाशदीप सिंगने भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, नेदरलॅंडनेही पहिल्या सत्राच्या अखेरीस मैदानी गोल करुन सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

थिएरी ब्रिंकमॅनने नेदरलॅंडला सामन्यात बरोबरी साधून दिली. तिसऱ्या सत्रानंतर नेदरलॅंडने मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा पुरेपूर फायदा उचलत आपल्या संघाला सामन्यात आघाडी मिळवून दिली. यानंतर अखेरच्या मिनीटापर्यंत भारताने सामन्यात बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. मात्र भक्कम बचाव करत नेदरलॅंडने आपल्या 2-1 अशा विजयावर शिक्कामोर्तब केला.

नेदरलॅंड्‌सला आता उपान्त्यफेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. उपांत्यफेरीचे दोन्ही सामने 15 डिसेंबरला होणार आहेत. यातील पहिला उपांत्यफेरीचा सामना इंग्लंड आणि बेल्जियम यांच्यामध्ये होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)