नेटफ्लिक्सवर येणार ‘बाहुबली’चा प्रिक्वेल 

लस्ट स्टोरीज आणि सॅक्रेड गेम्स या वेबसेरीजच्या अफाट यशानंतर नेटफ्लिक्स आता बाहुबली चित्रपटाच्या प्रिक्वेलवर काम करत असल्याचे नेटफ्लिक्सद्वारे सांगण्यात आले आहे. बाहुबली- द बिगिनिंग व बाहुबली- द कन्क्लुजन या दोन चित्रपटांच्या आधीचा भाग नेटफ्लिक्स वेबसेरीजच्या माध्यमातून दर्शकांसमोर आणणार आहे. नेटफ्लिक्सची वेब-मालिका ही चित्रपटातील एक प्रमुख पात्र शिवगामी यांच्या आयुष्यावर केंद्रित असणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या वेबसेरीजच्या माध्यमातून शिवगामी या शूर तरुणीचा मुत्सद्दी राज्यकर्ती बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. वेबसेरीजचे नामकरण ‘बाहुबली- बिफोर द बिगिनिंग’ असे करण्यात आले आहे. नेटफ्लिक्सद्वारे ‘बाहुबली- बिफोर द बिगिनिंग’ चे दोन सिझन बनवण्यात येणार असून पहिल्या सिझनमध्ये ९ एपिसोड्स असतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)