नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळून नेपाळच्या पर्यटन मंत्र्यांसह 6 जण ठार

काठमांडू – नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत नेपाळच्या पर्यटन मंत्र्यांसह सहा जण ठार झाले आहेत. नेपाळच्या नागरी उड्डयन प्राधिकाऱ्यांनी बुधवारी झालेल्या या दुर्घटनेत नेपाळचे पर्यटन मंत्री रबिंद्र अधिकारी आणि अन्य पाचजण मरण पावल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

एयर डायनॅस्टीच्या हेलिकॉप्टरमध्ये पर्यटन मंत्री रबिंद्र अधिकारी, उद्योजक अँग सेरिंग शेर्पा, युवराज दहल (पंतप्रधान कार्यालयाचे अंडर सचिव), नेपाळ नागरी उड्डयनचे उप महासंचालक बिरेंद्र प्रसाद श्रेष्ठ आणि अर्जुन कुमार घिमिरे यांचा समावेश असल्याची माहिती नेपाळचे पोलीस महानिरीक्षक सर्वेंद्र खनल यांनी दिली आहे. प्रभाकर केसी हे हेलिकॉप्टरचे पायलट होते. हे सर्व एका स्थानिक विमानतळाचे निरीक्षण करण्यासाठी जात होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एयरलाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक अँग सेंरिंग शेर्पा हेच एयर डायनॅस्टीचे अध्यक्ष आहेत. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर त्या ठिकाणी आगीचा मोठा लोळ उठल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. पुढील तपास चालू असल्याची माहिती सर्वेंद्र खनल यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)