नेपाळमध्ये बसवर एचटी केबल कोसळून 9 ठार 15 जखमी

रक्‍सौल (नेपाळ) :नेपाळमध्ये एका प्रवासी बसवर एचटी केबल (उच्च दाब विद्युत तार) कोसळल्याचे शॉक बसून 9 प्रवासी मरण पावले आहेत. नेपाळच्या धनुषा जिल्ह्यातील कोठिया बलटिया येथे ही दुर्घटना घडल्याची आणि तीमध्ये अन्य 15 प्रवासी गंभीर झाल्याची माहितीही पोलीसांनी दिली आहे. 15 जखमींपैकी 4 जणांची अवस्था गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. बसमध्ये एकूण 30 जण प्रवास करत होते.

सदर बस दुधौली नगरपालिका हद्दीतील जीतपूर येथील रामवरन अधिकारी यांच्या लग्नाचे वऱ्हाड घेऊन विवाह उरकून परत येत होती. असे डीएसपी गोविंद थापा यांनी सांगितले आहे. दोन बस आणि एका मोटरकार मधून येणाऱ्या वऱ्हाडातील लालिमा ट्रॅव्हल्सच्या एका बसवर 11.000 व्होल्ट ची केबल कोसळ्ल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)