जवळ्यात पालकमंत्री ना. शिंदे – युवा नेते रोहित पवार आमनेसामने

जवळा – जामखेड तालुक्‍यातील जवळा रथयात्रेत पालकमंत्री प्रा. राम शिंदे व राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार मंगळवारी दुपारी गुरुपोर्णिमेदिवशी जवळेश्‍वराच्या आरतीच्या निमित्ताने आमनेसामने आले. त्यामुळे आता काय होईल याविषयी सर्वाची उत्स्तुकात वाढली. मात्र दोघे एकमेकांना पाहून स्मितहास्य करत निघून गेले.

लोकसभा निवडणूकीपासून जाहीर सभांतून एकमेकांची उणीदुणी काढणारे पालकमंत्री प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार आरतीच्या निमित्ताने जामखेड तालुक्‍यातील जवळा येथे येणार असल्याने गावात सकाळपासूनच चर्चा सुरु होती. रोहित पवार यांनी कर्जत – जामखेड मतदार संघ पिंजून काढण्यात सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ते विधानसभेच्या मैदानात पालकमंत्री राम शिंदे यांना टक्कर देणार आहेत. त्या दृष्टीने त्यांनी राजकीय मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मंगळवारी सकाळी सिताराम गड मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचा उद्‌घाटन करून नान्नज येथील रथयात्रेच्या आरतीला रोहित पवार यांनी उपस्थिती लावली.

दुपारी 11.30 वाजता जवळा येथे आल्यानंतर युवकांनी वाजत गाजत मिरवणूक काढली. दुसरीकडे याच वेळेस पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांची भाजपा कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली. दुपारी आरतीच्या वेळी रोहित पवार यांनी रथयात्रेचे दर्शन घेतले. यावेळी पूजा सुरु असतानाच पालकमंत्रीदेखील त्या ठिकाणी एकत्र आले. त्यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दोन्ही नेते यावेळेस मात्र पूर्णपणे इलेक्‍शन मोडमध्ये दिसले. एकमेकांची गळाभेट तर सोडाच पण साधे हस्तांदोलनही न करता या दोघांनी केवळ स्मितहास्त केले.

त्यामुळे या पक्षीय राजकारणासोबतच या दोन नेत्यांमध्ये वैयक्तिक पातळीवरही संबंधातही बऱ्यापैकी वितुष्ट दिसून आले. यावेळेस उपस्थितामधून रोहित पवार यांच्या नावाने घोषणा दिल्या. यानंतर रोहित पवार मार्गस्त झाले.तर दुसरीककडे पालकमंत्री ना. शिंदे यांनी जवळेश्‍वराला भरपूर पाऊस पडून, दुष्काळ हटू दे असे साकडे घातले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)