अन 10 दिवसांतच नेहा धूपियाचे शुटिंग सुरू 

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया काही दिवसांपूर्वीच एका गोंडस मुलीची आई झाली आहे. विशेष बाब म्हणजे, मुलीच्या जन्मानंतर फक्‍त 10 दिवसांनंतरचे तिने पुन्हा शुटिंग करणे सुरू केले आहे.

हो हे खरे आहे, डिलिव्हरीनंतर मोठा ब्रेक न घेता नेहाने पुन्हा कामाला सुरूवात केली आहे. नेहाची 18 नोव्हेंबरला डिलिव्हरी झाली आणि 29 नोव्हेंबरला ती एका जाहिरातीचे शूटिंग करताना दिसली. ही जाहिरात कपड्यासंदर्भात होती. ज्यात नुकतीच आई झालेल्या नेहाचा मॅटरनिटी ग्लो स्पष्ट दिसत होता.

माजी मिस इंडिया नेहाने शूटिंगच्या सेटवरली आपली एक मिरर सेल्फीही शेअर केली आहे. ज्यात ती खूपच सुंदर दिसते. फोटोसोबत तिने “वर्क मोड ऑन’ अशी कॅप्शन लिहीली आहे.

नेहा आपल्या प्रोफेशनल लाइफ आणि कमिटमेंट्‌सबाबत किती गंभीर आहे हे तेव्हाच कळले होते, जेव्हा ती प्रेग्नंट असतानाही तिने “नो फिल्टर नेहा’चे शूटिंग सुरू ठेवले होते. त्यानंतर पुन्हा लगेच शूटिंगला सुरूवात करत तिने हे सिद्ध केले की, कुटुंबियांसोबतच आपले प्रोफेशनल लाइफ ती व्यवस्थीपणे सांभाळू शकते. दरम्यान, यावर्षी मे महिन्यात अंगद बेदी आणि नेहा धुपियाचा विवाह झाला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)