नेहा धुपियाचे सडेतोड उत्तर

बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडी नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांच्या घरी गतवर्षी नोव्हेंबरमध्ये चिमुकलीचे आगमन झाले होते. आई झाल्यानंतर नेहाने घर, आरोग्य आणि करिअर अशा तिन्ही गोष्टी ती सध्या उत्तमरित्या सांभाळत आहे. पण तिच्या स्थूलपणावरून एका वेब पोर्टलने टिका टिपण्णी केली होती. याला नेहाने सडेतोड उत्तर दिले आहे.

सोशल मीडियावर त्या वेब पोर्टलच्या बातमीचा स्क्रिनशॉट शेअर करत नेहाने चांगलेच खडेबोल सुनावले. नेहा म्हणाली, मी कोणत्याही उत्तरासाठी बांधिल नाही. कारण अशाप्रकारच्या कमेंट्‌समुळे मला काही फरक पडत नाही. पण एक मोठा मुद्दा म्हणून मला हा मांडायचा आहे. कारण फॅट शेमिंग हे फक्त सेलिब्रिटींसाठी नाही तर सर्वसामान्यांसाठीही थांबले पाहिजे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एक आई म्हणून मला माझ्या मुलीसाठी निरोगी, तंदुरुस्त आणि उत्साही राहायची इच्छा आहे. त्यासाठी मी दररोज व्यायाम करते. कधी कधी दिवसातून दोनदा करते. फिटनेस माझी प्राथमिकता आहे. पण चांगल दिसण्यासाठी किंवा समाजासमोर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी नाही. भविष्यात अशा प्रकारे कमेंट्‌स करण्यापूर्वी एकदा विचार करावा, अशी आशा आहे, असे तिने त्या पोस्टमध्ये लिहिले. या पोस्टला वरुण धवन, निम्रत कौरसह तिच्या चाहत्यांनी नेहाचे समर्थन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)