सीआरपीएफच्या मागणीकडे गृह खात्याचे “दुर्लक्ष’ 

नवी दिल्ली – पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यावरून अनेक चर्चाही झडत आहेत. यामध्ये सीआरपीएफकडूनही काहीतरी चूक झाली असावी, असे निष्कर्ष काढले जात आहेत. मात्र, याबाबत आता एक खळबळजनक खुलासा समोर आला आहे. सीआरपीएफने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे जवानांना घेऊन जाण्यासाठी हवाई प्रवासाची मागणी केली होती. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे वृत्त आहे.

नाव न सांगता सीआरपीएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने “द क्विंट’ने हा दावा केला आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, काश्‍मीर खोऱ्यात गेल्या पंधरा दिवसांत सुरु असलेल्या मोठ्या बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद झाल्याने सीआरपीएफचे शेकडो जवान येथे अडकून पडले होते. त्यातच जवानांचा एक जत्था 4 फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्‍मीर बाहेर पडला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काश्‍मीर खोऱ्यातून प्रवास करणे हे मोठे जोखमीचे काम असल्याने आम्ही कायम आमच्या सुरक्षेबाबत अलर्ट असतो. मात्र, बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद झाल्यामुळे अडचण येत असल्याने आमच्या जवानांना विमानांद्वारे इथून बाहेर काढण्यात यावे, अशी विनंती आम्ही सीआरपीएफच्या मुख्यालयाकडे केली होती. आमची ही सूचना नियमानुसार केंद्रीय गृहखात्याकडे पाठवण्यात आली. मात्र, यावर काहीही घडले नाही, कोणीही याला गांभीर्याने घेतले नाही.

विमानाद्वारे जवानांना घेऊन जाणे हे केवळ सुरक्षित नव्हे तर वेळेची बचत करणारे आणि कमी खर्चिक होते. त्यामुळे पुन्हा एकदा आठवड्याभरापूर्वीच गृहखात्याकडे जवानांना विमानांद्वारे नेण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, त्याकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, गुप्तचर यंत्रणांनी 8 फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या उच्चाधिकाऱ्यांना एक पत्र लिहून हल्ल्याची शक्‍यता वर्तवली होती. या भागात कसून चौकशी करा, कारण काश्‍मीर खोऱ्यात आयईडीद्वारे स्फोट घडवून आणण्याचा कट रचला जात आहे. मात्र, यालाही गांभीर्याने घेतले गेले नाही.

गृह खात्याने दावा फेटाळला

सीआरपीएफने केलेल्या जम्मू-श्रीनगर सेक्‍टरमध्ये हवाई मार्गाच्या (एअर ट्रान्सिट) मागणीकडे केंद्रीय गृह खात्याकडून दुर्लक्ष करण्यात आल्याच्या वृत्ताचे गृह खात्याने खंडण केले आहे. अशा प्रकारे सीआरपीएफला परवानगी नाकारण्यात आली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)