कर्जबुडव्या नीरव मोदीला लंडनमधून अटक; आजच न्यायालयात करणार हजर

लंडन – पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. त्याला थोड्याच वेळात लंडन येथील न्याालयात हजर केले जाणार आहे.

नीरव मोदी हा पंजाब नॅशनल बॅंकेला (पीएनबी) सुमारे 13 हजार कोटी रुपयांचा गंडा घालून भारतातून परदेशात पसार झाला होता. काही दिवसापूर्वीच फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याला लंडन कोर्टाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. गेल्या कित्येक महिन्यांपासून भारतातील यंत्रणा नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहेत.

काही दिवसांपूर्वी नीरव मोदी हा लंडन मध्ये वास्तव्यास असून तेथेच मुक्त संचार करत असल्याचे लंडनच्या ‘द टेलिग्राफ’ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले होते. नीरव मोदीने बनावट कागदपत्रांच्या आधारे पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींचा गंडा घातला असून त्याच्या विरोधात भारतीय तपास यंत्रणांनी इंटरपोल कडे रेड कॉर्नर नोटीस जारी केलेली होती. त्यामळे लंडन कोर्टाकडून नीरव मोदीला अटक वॉरंट जारी करण्यात आला होतं. त्यानंतर आज 13 हजार कोटींचा चुना लावणाऱ्या नीरव मोदींला अखेर गजाआड करण्यात आल्याने भारताच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)