नीरज शेखर भाजप मध्ये

नवी दिल्ली – दिवंगत माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे चिरंजीव व माजी खासदार नीरज शेखर यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे सरचिटणीस भुपेंद्र यादव आणि अनिल जैन यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्ष प्रवेश केला. ते समाजवादी पक्षात कार्यरत होते. राज्यसभेचेही ते सदस्य होते. पण त्यांनी आता समाजवादी पक्षाचा आणि राज्यसभा सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.

त्यांनी आपल्या वडिलांच्या बलिया या मतदार संघातून सन 2007 आणि 2009 मध्ये निवडणूक लढवली होंती. व दोन्ही वेळा ते विजयी झाले होते. तथापी 2014 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

त्यानंतर समाजवादी पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवले होते. आता त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आता भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्‍यता आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)