आशियाई स्पर्धेत नीरज चोप्रा भारताचा ध्वजधारक 

नवी दिल्ली: जकार्ता येथे येत्या 18 ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या आशियाई क्रीडास्पर्धांसाठी भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्राला ध्वजधारक म्हणून भारतीय चमूचे नेतृत्व करण्याचा मान देण्यात आला आहे. याआधी गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत हा मान पीव्ही सिंधूला मिळाला होता. 

त्यामुळे 18 व्या आशियाई स्पर्धेच्या उद्‌घाटन सोहळ्यात नीरज चोप्रा भारताचा ध्वजधारक म्हणून दिसणार आहे. भारतीय ऑलिम्पिक संघाचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी आज ही घोषणा केली. आशियाई क्रीडास्पर्धा 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेमबांग येथे होणार आहे. 

-Ads-

नीरज चोप्राने 2016 मध्ये आयएएफ 20 वर्षांखालील जागतिक मैदानी स्पर्धेत भारताला भालाफेकीत सुवर्णपदक जिंकून दिले होते. तसेच त्याने 2017 आशियाई मैदानी स्पर्धेत 85.23 मीटर फेकी करताना भारताला सुवर्णपदक जिंकून दिले होते. याआधी 2014 च्या आशियाई स्पर्धेत भारताचे माजी हॉकी कर्णधार सरदार सिंग ध्वजधारक होते. 

कोरियातील इंचिऑनमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने 11 सुवर्ण, 10 रौप्य आणि 36 कांस्य पदकासह एकूण 57 पदकांची कमाई केली होती. भारताने दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये एकूण 101 पदकांची कमाई केली होती. तर 2002 मध्ये मॅंचेस्टर येथील स्पर्धेमध्ये 69 पदके मिळवली होती. जकार्ता आशियाई स्पर्धेतील ऍथलेटिक्‍स स्पर्धा 25 ऑगस्ट रोजी सुरू होत आहेत. मात्र नीरजला उद्‌घाटन सोहळ्यासाठी 17 ऑगस्ट रोजीच तेथे पोहोचावे लागणार आहे. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)