सोमेश्वरनगर: निंबुत छपरी (ता.बारामती )नजीक निरा बारामती रोड लगत असणाऱया नीरा डावा कालव्यच्या भरावाच्या दोन्ही बाजूस काटेरी झुडपे वाढलेली आहेत . ही काटेरी झुडपे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करत असून ही चांगली जोमात वाढलेली आहेत.त्याचबरोबर ही झुडपे निरा डाव्या कालव्याच्या भरावास धोकादायक ठरु शकतात संबंधित विभागाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होता संबंधित विभागाने याची लवकरात लवकर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी.