फसव्या सरकारसाठी ‘चले जाव’चा नारा देण्याची गरज- जयंत पाटील

मुंबई: भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील निर्णायक लढा ‘ऑगस्ट क्रांती’ चळवळीत झालेल्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या ७६ व्या वर्षापूर्तीनिमित्त आज राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ऑगस्ट क्रांती मैदानात जाऊन स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ऑगस्ट क्रांती मैदान येथे राष्ट्रध्वजास क्रांतिदिनी अभिवादन केले. ते म्हणाले , “१९४२ साली ‘चले जाव’ चा नारा गांधीजींनी ब्रिटिशांसाठी दिला होता. आज आपण याच ऐतिहासिक मैदानातून तो नारा बेरोजगारी वाढवणाऱ्या, खोट्या घोषणा देणाऱ्या फसव्या सरकारसाठी देण्याची गरज आहे. चले जाव !”

पाटील पुढे म्हणाले, “ज्यांचं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि देशाच्या विकासात कोणतंही योगदान नाही ते लोक आज देशाच्या ६० वर्षांच्या कारभाराचा हिशोब मागत आहेत. येणाऱ्या काळात पुरोगामी विचारांची लढाई अवघड आहे, मात्र अशक्य नाही”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)