गोव्यातील नेतृत्वबदल काळाची गरज : श्रीपाद नाईक 

पणजी – गोव्याचे मुख्यमंत्री हे दिर्घ काळापासून आजाराने ग्रासले आहे. पण या स्थितीतही ते राज्यातील कारभार उत्तम प्रकारे चालवित आहेत. मात्र, आज किंवा उद्या गोव्यातील नेतृत्वा बदल हा करावाच लागणार आहे. ती काळाची गरज आहे, असे मत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले आहे. केंद्रीय मंत्र्यानेच गोव्यात नेतृत्वबदलाची भूमिका मांडल्याने भाजपची कोंडी होण्याची चिन्हे आहेत.

शुक्रवारी एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात त्यांनी नेतृत्वबदलाबाबत भूमिका मांडली. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीबाबत सर्वांनाच माहित आहे. त्यांची प्रकृती पाहता गोव्यात आज किंवा उद्या नेतृत्व बदल करावाचे लागेल, ही काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे गोव्यात नेतृत्व बदल करणार नाही, असे पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट केल्यानंतरही श्रीपाद नाईक यांनी ही भूमिका मांडली आहे.

-Ads-

दरम्यान, मनोहर पर्रिकर मुख्यमंत्रीपदावर असेपर्यंतच भाजपाला पाठिंबा देऊ अशी भूमिका महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी आणि गोवा फॉरवर्ड पार्टी या पक्षांनी घेतली आहे. सध्या गोव्यात या दोन पक्षांच्या पाठिंब्यावरच भाजपाची सत्ता आहे. तर दुसरीकडे भाजपामधील अंतर्गत संघर्षही चव्हाट्यावर आला आहे. कॉंग्रेसच्या दोन आमदारांना पक्षात घेतल्याने एक गट नाराज आहे. गोव्यातील भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या निर्णयावर या गटाने नाराजीही व्यक्त केली होती. त्यामुळे गोव्यात आता भाजपा काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)