राईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर 

कोल्हापूर – भारताच्या नवनिर्माणासाठी युवा पीढीच्या कर्तृत्वावर विश्वास दाखवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पद्‌मविभूष डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. सध्या जगभरामध्ये आयटीची चर्चा आहे. मात्र मी इंडियन टॅलेंट महत्वाचे मानतो. राईट टू एज्यकेशन ही संकल्पना आता आपण पूर्ण केली आहे. मात्र यापुढच्या काळात राईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर येथे आयोजित “शतकोत्तर पहिल्या अक्षरगप्पा’ कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. भारतातील संशोधनाचा आढावा घेताना डॉ. माशेलकर म्हणाले, तंत्रज्ञानामुळे आता कुणालाही, कुठेही आणि कधीही ज्ञान उपलब्ध होत असल्याने आता शिक्षकाची भूमिका बदलली आहे. आयुष्याच्या प्रयोगशाळेमध्ये अथकपणे परिश्रम घेउन आल्या पूर्वजांनी जे ज्ञान संपादन केले आहे. त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर भारत जगभरामध्ये आघाडीवर राहू शकतो, असे ते म्हणाले. निर्धार प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर देशपांडे यांनी प्रास्ताविकामध्ये अक्षरगप्पांच्या प्रवासाचा आढावा घेतला.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)