लोकपाल यंत्रणा सक्रिय होण्याची गरज -वीरप्पा मोईली

केंद्र सरकारकडून होत आहे अक्षम्य टाळाटाळ

नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाचवण्यासाठीच केंद्र सरकारने लोकपाल कायदा लागू केलेला नाही. तो लवकर लागू करण्याची गरज असल्याचे माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यानी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जर हा कायदा लागू झाला असता तर राफेल विमान करारप्रकरणी पहिले आरोपी नरेंद्र मोदी हेच ठरले असते, असा आरोप त्यांनी केला. वीरप्पा मोईली म्हणाले की, केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्रासाठी केलेली आर्थिक तरतूद ही चीनच्या एकूण संरक्षणाच्या तरतुदीचा केवळ पाचवा भाग आहे. आता त्यातील 20 टक्‍के रक्‍कम ही राफेल विमानांसाठी जाईल. त्यातून सरकारचा कमकुवतपणा उघड झाला आहे. म्हणूनच सरकार लोकपाल विधेयक लागू करत नाही. जर लोकपाल विधेयक लागू झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पहिले आरोपी ठरू शकतात. त्यामुळेच ते सध्या घाबरले आहेत. तसेच या प्रकरणाची जेपीसी चौकशीही करण्यात आलेली नाही.

मोईली पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाचू शकतात, पण उद्या नाही. पंतप्रधान सर्वांविरोधात इडी आणि सीबीआयचा वापर करत आहेत. मात्र राफेल किंवा अन्य कुठल्याही शस्त्रास्त्रांची खरेदी करण्याविरोधात कॉंग्रेस पक्ष नाही. तुम्ही 70 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाही.
दरम्यान, भारतीय हवाईदलासाठी दस्सॉल्ट या फ्रेंच कंपनीकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा 7.87 अब्ज युरो खर्चाचा करार फ्रेंच सरकारशी करण्याच्या काही दिवस आधी मोदी सरकारने अशा प्रकारच्या करारांमध्ये एरव्ही नियमितपणे समाविष्ट केली जाणारी एकूण आठ कलमे वगळली.

विशेष म्हणजे या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाने नेमलेल्या अधिकृत वाटाघाटी समितीच्या चर्चा अपूर्ण असतानाच पंतप्रधान कार्यालयातून सूत्रे फिरू लागल्यानंतर प्रस्तावित करारात करायचे हे बदल घाईघाईने मंजूर केले गेले. राफेल विमान करारावरून भाजपा आणि कॉंग्रेसमध्ये दररोज आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)