पाकिस्तानातील काळापैसा रोखण्यासाठी नवीन कायद्याची गरज – इम्रान खान

इस्लामाबाद: आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला त्यातून बाहेर काढायचे असेल तर काळा पैसा पांढरा करण्याच्या प्रकाराविरोधात कडक कायदा करण्याची गरज आहे, भ्रष्टाचाराला लगामही घालण्याची गरज आहे असे प्रतिपादन पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. ते म्हणाले की असे नवीन कायदे आम्ही आणत आहोत येत्या आठवडाभरात ते लागू करण्याचा आमचा इरादा आहे. देशातील हवाला आणि हुंडीचे बेकायदेशीर आर्थिक व्यवहारही थांबवण्याची गरज आहे असे ते म्हणाले.

काल पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान कार्यालयात काळ्या पैशाच्या संबंधात एक उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यात देशात केल्या जाणाऱ्या कायदेशीर उपाययोजनांच्या विषयावर चर्चा करण्यात आली. बॅंकिग क्षेत्रावर नियंत्रण आणण्यासाठी एक नवी नियायमक यंत्रणाही स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. कायदेशीर मार्गाने व्यवहार करणाऱ्यांना सवलती देण्याचाहीं आमच्या सरकारचा विचार आहे असे त्यांनी सांगितले. सध्या आमच्या सरकारने स्टेट बॅंक ऑफ पाकिस्तानला नियामक संस्था म्हणून काम करण्यास सांगितले आहे त्यांच्या मार्फतच बोगस बॅंक खाती आणि गैरप्रकारांच्या विरोधात उपाययोजना केल्या जातील असे ते म्हणाले.

आर्थिक शिस्तीसाठीची प्रशासकीय व्यवस्था करण्यासाठी राष्ट्रीय तसेच प्रांतीय पातळीवर टास्क फोर्सही नेमण्याचा निर्णय इम्रान खान यांच्या सरकारने घेतला आहे. सरकारी व्यवस्थेतून चोरलेला पैसा विदेशात पाठवण्यावरही कडक उपाययोजना केली जाणार असल्याचे इम्रान खान यांनी या बैठकीत सांगितले. सध्या पाकिस्तानकडे असलेली विदेशी चलनाची गंगाजळी जेमतेम आठ अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत खाली आहे. त्यामुळे ही स्थिती सुधारण्याचे काम या सरकारला अग्रक्रमाने करावे लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)