#NEDvSCO : नेदरलॅंडचा स्काॅटलंडवर दणदणीत विजय 

Oman T20I of the quadrangular series :

ओमान – चार देशांच्या चतुर्भुज टी20 क्रिकेट मालिकेतील नेदरलॅंड विरूध्द स्काॅटलंड यांच्यातील पहिल्या टी20 क्रिकेट सामन्यात नेदरलँडने स्काॅटलंडवर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळविला आहे.

नेदरलँडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना स्काॅटलंडच्या संघाने 20 षटकांत 7 बाद 153 धावासंख्या केली. प्रत्युत्तरात नेदरलँडने 19.5 षटकातं 3 बाद 154 धावा करत स्काॅटलंडवर विजय संपादित केला.

नेदरलॅंड संघाकडून गोलंदाजीत टिम व्हॅन डर गुगटेन याने 4 षटकांत 35 धावा देत सर्वाधिक 2 गडी बाद केले. तर फलंदाजीत टोबीस विसे याने 43 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकारासह 71 धावांची खेळी केली. टोबीस विसे याला या कामगिरीबदल सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

दरम्यान, ओमानमध्ये चतुर्भुज टी20 क्रिकेट मालिका सुरू आहे. यामध्ये ओमान, आयर्लंड, नेदरलॅंड आणि स्काॅटलंड यांचा समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)