अमेरिकेत उत्तर कॉरोलिनातील आगीमुळे सुमारे एक हजार बेपत्ता 

लॉसएजंल्स – अमेरिकेत नॉर्थ कॅरोलिना येथील जंगलाला लागलेल्या वणव्यात त्या परिसरातील अनेक गावांमध्ये प्रचंड नुकसान झाले असून आगीमुळे तेथील सुमारे एक हजार लोक बेपत्ता झाले आहेत. त्यातील बहुतेकांचे या आगीत बळी गेले असावेत असा कयास आहे.

या कौन्टीचे शेरीफ कोरी होनी यांनी म्हटले आहे की गुरवार पर्यंत आगीत बेपत्ता झालेल्यांची संख्या 631 इतकी होती ती आता 1011 वर पोहचली आहे. 71 जणांचे जळालेले मृतदेह आत्तापर्यंत हाती आले आहेत. साऊदर्न कॅरोलिना मध्येही अशाच प्रकारची आग अलिकडेच लागली आहे.

-Ads-

त्यातही मोठी जीवित हानी झाली आहे. नॉर्थ कॅरोलिना मधील आगीमुळे बेपत्ता झालेल्यांची संख्या मोठी दिसत असली तरी ते सर्वच जण यात मरण पावले आहेत असा याचा अर्थ होत नाही, मदत पथके त्यांचा घटनास्थळी शोध घेत आहेत असे अमेरिकेतील संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)