एनडीएफबीच्या नऊ गनिमांना अटक

इटानगर: बंदी घालण्यात आलेल्या एनडीएफबी या संघटनेच्या नऊ जणांना अरूणाचल प्रदेशातील जयरामपुर येथे पोलिसांनी आणि लष्करी अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करून अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. हे गनिम म्यानमार मध्ये कारवायांचे प्रशिक्षण घेऊन भारतात परत येत असताना रविवारी त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती राज्याचे पोलिस महासंचालक एसबीके सिंग यांनी दिली.

त्यांच्या ताब्यातून काही पिस्तुले, एके 56 रायफली आणि त्यांना लागणारा दारूगोळा जप्त करण्यात आला. घुसखोर गनिमांची टोळी भारतात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिस व आसाम राफयल्सच्या जवानांना मिळाल्यानंतर त्यांनी घुसखोर ज्या मार्गाने भारतीय हद्दीत शिरण्याची शक्‍यता होती तेथे नाकाबंदी केली होती. त्यात हे नऊ जण अलगद अडकले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)