राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा भारती पवार करणार भाजपात प्रवेश

नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा भारती पवार या शुक्रवारी भारतीय जनता पक्षात सामील होणार आहेत. भारती पवार या दिंडोरी लोकसभा मतदार संघातून उमेदवारीसाठी इच्छुक होत्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिंडोरी येथे माजी आमदार धनराज महाले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भारती पवार यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. भारती पवार या शुक्रवारी भाजपात प्रवेश करणार आहेत.

सुजय विखे पाटील, रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्यानंतर आता भारती पवार या भाजपात प्रवेश करणार आहेत. धनराज महाले हे ऐन निवडणुकीच्यावेळी पक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे भारती पवार या नाराज असल्याचे बोलले जात होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)