गुजरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वबळाचा नारा !

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने गुजरातमध्ये स्वबळाची नारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुजरातमधून लोकसभेच्या सर्वच्या सर्व २६ जागांवर निवडणूक लढवली जाणार असल्याचे वृत्त होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जागावाटपाच्या वाटाघाटींवर एकमत न होऊ शकल्याने राष्ट्रवादी काँग्रेस गुजरातमध्ये लोकसभेच्या सर्व जागा लढविणार आहे.

महाराष्ट्रामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र निवडणुका लढवत असून राज्यामध्ये काँग्रेस २६ तर राष्ट्रवादी २२ जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार असून दोन्ही पक्षांकडून मित्रपक्षांची प्रत्येकी २ जागा सोडण्यात येणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल यांनी सर्व लोकसभा मतदार संघात लढण्याची माहिती दिली. येत्या दोन-तीन दिवसात राष्ट्रवादी आपले उमेदवार घोषित करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)