राष्ट्रवादीच्या आमदाराचा राजीनामा

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहापुरचे आमदार पांडुरंग वरोरा यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आज आपला राजीनामा विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्याकडे सादर केला त्यावेळी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे त्यांच्या बरोबर उपस्थित होते. त्यामुळे आमदार वरोरा हे शिवसेनेत जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

आमदार वरोरा यांचा राजीनामा आणि माळशीरसचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार हनुमंत डोळस यांचे निधन यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ आता 39 वर आले आहे. विधानसभेत त्यांच्या पक्षाचे एकूण 41 आमदार होते. तथापी आता केवळ तीन महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका आल्याने या संख्याबळाला आता तांत्रिकदृष्ट्या फार महत्व नाहीं. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक विद्यमान आमदार शिवसेनेच्या गळाला लागल्याने त्याला राजकीय महत्व दिले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)