बीडमध्ये राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या

बीड: बीड जिल्ह्यातील परळी नगरपरिषदेचे माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. पांडुरंग गायकवाड यांच्या तलवारीने हल्ला करण्यात आला होता. गायकवाड हे राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका मीनाबाई गायकवाड यांचे पती आहेत.

निवडणुकांच्या रणधुमाळीत झालेल्या माजी नगरसेवकाच्या हत्याकांडामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पांडुरंग गायकवाड हे परळी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक होते. गायकवाड हे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांचे समर्थक मानले जात होते.

परळी ओव्हरब्रिजच्या खाली काल (रविवारी) रात्री त्यांच्यावर तलवारीला हल्ला करण्यात आला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्याचे कारण अस्पष्ट असून पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)