राष्ट्रवादीच्या ‘या’ माजी मंत्र्याचा भाजपमध्ये प्रवेश

जालना – भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बैठक आज जालना येथे पार पडली. यावेळी जालन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

आता ढोबळे यांना सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपकडून तिकीट मिळणार की नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे. लक्ष्मण ढोबळे हे भाजपाकडून सोलापूरातील लोकसभेच्या जागेसाठी इच्छुक असल्याचे म्हटले जात आहे. तस झाल्यास ते थेट सुशीलकुमार शिंदे विरोधात रिंगणात उतरतील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लक्ष्मण ढोबळे हे सोलापूरमधील मोहोळ-मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभेचे आमदार होते. तसेच त्यांनी त्यावेळी मंत्रीपदही भूषविले होते. 2014 साली मुंबईतील एका महिलेने त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप केल्यानंतर त्यांची मोठी कोंडी झाली होती.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोलापुरात आले होते. तेव्हा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी लक्ष्मण ढोबळे यांनी गडकरी यांचे पाय धरल्याचे फोटो व्हायरल झाले होते. तेव्हा ढोबळे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उत आला होता. अखेर आज सोमवारी त्यांनी जालना येथे भाजपात प्रवेश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)