अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांचे निलंबन

नगर – अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाला मदत केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांना निलंबित करण्यात आले आहे. पक्षादेशाचा भंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाअध्यक्ष जयंत पाटील यांनी ही कारवाई केली आहे.

संबंधित नगरसेवकांना पदावरुन काढून टाकण्यात  येत असल्याचे तसे पत्र  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून नगरसेवकांना पाठविणयात आलय.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वासह प्रदेश व जिल्हा नेतृत्वाने शिवसेना व भाजपबरोबर न जाण्याचे आदेश दिले होते मात्र ते धुडकावून महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 18 नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला. केवळ पाठिंबा देऊन थांबले नाही तर भाजपच्या महापौर व उपमहापौरपदाच्या उमेदवारांना मतदान देखील केले. पक्षाविरोधी घडामोडी होत असताना देखील पक्षश्रेष्ठींना याबाबतची माहिती अथवा कल्पना दिली गेली नाही. त्यामुळे पक्षविरोधी कृत्य केल्यामुळे ही कारवाई केल्याचे जयंत पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे.

संबंधित नगरसेवकांना 28 डिसेंबर 2018 रोजी नोटीस पक्षातर्फे देण्यात आली होती, मात्र नोटीसीबाबत अद्याप खुलासा न केल्याने परिणामी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई करत अखेर 18 नगरसेवकाचं पक्षातून बडतर्फ करण्यात आलं आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
7 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)