‘भाजप-शिवसेने’ला राष्ट्रवादीकडून ‘प्रपोज डे’ च्या शुभेच्छा.

पुणे – ‘प्रपोज डे’ च्या निमित्ताने राष्ट्रावादी काँग्रेसने सध्या सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेना सरकारला ‘प्रपोज डे’ च्या शुभेच्छा देत टीका केली आहे. तसेच भाजप-शिवसेना म्हणजे “तुझं माझं जमेना, सत्तेवाचून करमेना” असं असल्याचे देखील राष्ट्रवादीने म्हटले आहे.

2014 विधानसभेच्या निवडणूकीवेळी ‘सेना-भाजप’ वेगवेगळे निवडणूक लढले होते, मात्र त्यांनतर युती करत महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. सध्या ‘भाजप-शिवसेना’ दोन्ही पक्षांचे युतीचे सरकार राज्यामध्ये सत्तेवर आहेत. असे असूनही दोन्ही पक्षाकडून एकमेकांवर नेहमी आरोपप्रत्यारोप केले जातात. मात्र सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूका जवळ येत आहेत, दोन्ही पक्षामध्ये अद्याप यूतीबाबत स्पष्ट झालेले नाही. यूतीबाबत दोन्ही पक्षाकडून नेहमी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जातात. नेमका हाच मुद्दा लक्षात घेत राष्ट्रवादीने भाजप-शिवसेना म्हणजे “तुझं माझं जमेना, सत्तेवाचून करमेना” असे म्हणून दोन्ही पक्षांवर टीका केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रवादीने यासंदर्भातील एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. एका फोटोमध्ये उध्दव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांनी नमस्कार करताना दिसत आहे. या फोटोला राष्ट्रवादीने “युतीसाठी रोज करतात-प्रपोज” असे कॅप्शन दिले आहे. तर दुसरीकडे हे दोघेही एकमेकांच्या विरूध्द दाखवले आहेत आणि या फोटोला “सत्तेत आल्यावर मात्र एकमेकांस अपोज” असे कॅप्शन दिले आहे.

फोटोतून राष्ट्रवादीला असे सूचवयाचे आहे की, ‘भाजप-शिवसेना’ हे निवडणूकीआधी युतीसाठी एकमेकांच्या गाठी भेटी घेतात मात्र सत्तेत आल्यावर मात्र एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून दोन्ही पक्षांमध्ये युती नसल्यासारखे वागतात. त्यामुळे राष्ट्रवादीने ‘भाजप-शिवसेना’ यांना ‘प्रपोज डे’ च्या शुभेच्छा देत दोघांवरही निशाणा साधला आहे.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्याला सुरूवात झाली की, तरूणांमध्ये उत्सुकता असते ती व्हॅलेंटाइन डे सप्ताह साजरा करण्याची. या व्हॅलेटाइन डे सप्ताह मध्ये 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान विविध डे ज साजरे करतात. यातील 8 फेब्रुवारी रोजी साजरा होणाारा डे म्हणजे  प्रपोज डे होय. यादिवशी तुम्ही तुमच्या आवडीच्या व्यक्तीकडे भावना व्यक्त करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)