लोकसभा निवडणुकीत कन्हैया कुमारला पाठिंबा देणार- राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसने बेगुसराय लोकसभा मतदारसंघामध्ये कन्हैया कुमारला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. तसेच रायबरेली आणि अमेठीमध्ये काँग्रेसचा निवडणूक प्रचार करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.

ज्या ठिकाणी महाआघाडीचे उमेदवार नाहीत, तिथे जो योग्य उमेदवार असेल त्या उमेदवाराला मोदींच्या विरोधात ताकद देणार. शिवाय वाराणसीमधून मोदींच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांचा मिळून एकच उमेदवार देण्याबाबत विचार सुरू असल्याचेही त्रिपाठी यांनी सांगितले.

https://twitter.com/NCPspeaks/status/1111221401220857856

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)