राष्ट्रवादी कॉंग्रेस देणार तृतीयपंथीयांना “तिकीट’ : खासदार सुळे

प्रदेशाध्यक्षांकडे आग्रह धरणार

पुणे: राज्यातील तृतीयपंथीय नागरिकांना मुख्य प्रवाहात सामाविष्ट करण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांबाबत जागृती निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रयत्नशील आहे. येत्या निवडणुकांमध्ये पक्षातर्फे तृतीयपंथी उमेदवाराला तिकीट देण्यासाठी आपण आग्रही आहोत, असे पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुण्यात झालेल्या एका साहित्यिक संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलताना सुळे यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या,”सत्ताधारी पक्ष फारसा अनुकूल नसताना लोकसभेत आम्ही समलिंगी संबंधांना आणि सरोगसी विषयक विधेयकाला संमती मिळवली. राष्ट्रवादी कॉंग्रेस हा नेहमीच धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून कार्य करत असतो. समाजातील वंचित घटकांचे सामाजिक परिवर्तन घडविण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. त्यामुळेच समाजातील या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही पाऊल पुढे उचलणार असून आगामी निवडणुकीत एका तरी तृतीयपंथीला तिकीट दिले जाईल, असा आग्रह प्रदेशाध्यक्षांकडे धरणार आहे.’

साहित्य क्षेत्रातही तृतीयपंथीय समाज मोठ्या प्रमाणात सहभागी होत असून, येत्या काळात तृतीयपंथीय नागरिकांच्या जीवनावर आधारित अथवा त्यांनी लिहलेले साहित्य मोठ्या प्रमाणात वाचायला मिळतील, अशी अपेक्षाही सुळे यांनी व्यक्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)