मध्यप्रदेशात राष्ट्रवादी २०० जागा लढवणार

भोपाळ: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज मध्य प्रदेश मध्ये २८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाकडून २०० पेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज मध्य प्रदेश निवडणुकांसाठी पक्षाचा अधिकृत जाहीरनामा देखील सादर करण्यात आला. पक्षाचे वरिष्ठ नेते राजेंद्र जैन आणि गुजरात राष्ट्रवादीचे प्रवक्ता नकुल सिंह यांनी जाहीरनामा सादर करताना पक्ष ‘सर्व समवैचारिक पक्षांशी आघाडी करण्यास तयार असल्याचा’ सूचक सल्ला दिला.

तत्पूर्वी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी मध्यप्रदेश निवडणुकांमध्ये ‘काँग्रेस’ बरोबर आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले होते, अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही मध्यप्रदेशात २०० पेक्षा जास्त जागा लढवणार असल्याचे सांगितले असल्याने मध्यप्रदेशमधील निवडणुकांमध्ये राजकीय गणिते कशाप्रकारे जुळून येतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

-Ads-

दरम्यान राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये युवकांसाठी नौकऱ्या, काँट्रॅक्ट बेसिसवर शिक्षकांच्या भरतीवर बंदी, महिला सुरक्षा व इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणणे या प्रमुख घोषणा केल्या आहेत.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
681 :thumbsup: Thumbs up
347 :heart: Love
9 :joy: Joy
49 :heart_eyes: Awesome
11 :blush: Great
6 :cry: Sad
8 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)