शेतकऱ्यांच्या लेकींचा ‘अन्नत्याग’ भाजपला सत्तात्याग करायला भाग पाडेल : जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांनी आज अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबे गावात शेतकऱ्यांच्या लेकींनी सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनावरून भाजप सरकारवर चांगलाच निशाणा साधला. जयंत पाटील यांनी पुणतांबे येथे सुरु असलेल्या या आंदोलनाबाबत आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून आपली भूमिका मांडताना, “पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या लेकींचे हे अन्नत्याग आंदोलन या बेजबाबदार भाजप सरकारला सत्तात्याग करायला भाग पाडणार ! #KisanLongMarch #Farmers #परिवर्तनयात्रा” असे ट्विट केले आहे.
जयंत पाटील यांनी केलेल्या या ट्विटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सध्या राज्यभरामध्ये विविध ठिकाणी सुरु असलेल्या परिवर्तन यात्रेचा टॅग देखील वापरण्यात आला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आता शेतकरी आंदोलनावरून राज्यसरकारला चांगलेच धारेवर धरण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
तत्पूर्वी, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी शेतकऱ्यांच्या लेकी मैदानात उतरल्या असून वयाच्या विशीमध्ये असलेल्या या १० ते १५ शेतकऱ्यांच्या लेकींनी पुणतांबे येथे धरणे आंदोलन सुरु केले आहे. किसान क्रांती मोर्चाच्या अंतर्गत सुरु असलेल्या या धरणे आंदोलनाच्या प्रमुख मागण्या शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी, शेतीमालाला योग्य हमीभाव, शेतकऱ्यांनी विकलेल्या दुधाला ५० रुपये प्रति लिटर भाव राज्यसरकारने द्यावा या आहेत.

पुणतांब्यात शेतकऱ्यांचे पुन्हा आंदोलन ! यावेळी शेतकऱ्यांच्या लेकी मैदानात

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)