राष्ट्रवादीला धक्का; जयदत्त क्षीरसागर शिवसेनेच्या वाटेवर 

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून ते मातोश्रीवर शिवबंधन बांधतील. जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेना प्रवेश हा बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का मानला जात आहे.

जयदत्त क्षीरसागर हे गेल्या अनेक दिवसांपासून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे बीडमधील नेते धनंजय मुंडे यांच्यावर नाराज होते.  जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी विरोधात बंड करत भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना विजयी करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून राष्ट्रवादीत नाराज असलेल्या क्षीरसागर यांनी दोन प्रीतम मुंडेंना पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे  जयदत्त क्षीरसागर नक्की शिवसेना कि भाजपात  स्पष्ट नाही.

https://twitter.com/ANI/status/1131043439825436672

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)