अखेर शिरूर आणि मावळ लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवार जाहीर

मुंबई: लोकसभा निवडणूक अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेसने गुरूवारी महाराष्ट्रातील १० आणि लक्षदीप मधील १ उमेदवार जाहीर केले होते. मावळ आणि शिरूर येथील उमेदवारीबदल मात्र सस्पेन्स कायम होता. त्यानंतर आज राष्ट्रवादीकडून शिरूर आणि मावळ लोकसभासाठी पक्षाकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून शिरूरसाठी अमोल कोल्हे यांना तर मावळसाठी पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

  1. धनराज महाले -दिंडोरी(24)
  2. समीर भुजबळ- नाशिक(25)
  3. डाॅ. अमोल कोल्हे – शिरूर(36)
  4. बजरंग सोनवणे- बीड(39)
  5. पार्थ अजित पवार – मावळ(33)

राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर ! ‘हे’ आहेत उमेदवार

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)