लोकसभा2019 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारक यादीत ‘या’ 40 नेत्यांचा समावेश

संग्रहित छायाचित्र..

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्टार प्रचारक नेत्यांची यादी जाहीर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, डी.पी. त्रिपाठी, सुनील तटकरे, शंकरसिंग वाघेला, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, सुप्रिया सुळे, धनंजय मुंढे यांच्यासह आणखी 29 जणांचा समावेश आहे.

काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत दाखल झालेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंग वाघेला यांचाही यादीत समावेश करण्यात आलाय. तर शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांचा देखील यामध्ये समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘लोकसभा निवडणूक २०१९’ साठीचा जाहीरनामा प्रसिद्ध

दरम्यान, आज राष्ट्रवादीतर्फे दिल्लीमध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठीचा जाहीरनामा देखील प्रसिध्द करण्यात आला आहे. हा जाहीरनामा तीन भाषेत प्रकाशित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)