#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका

पुणे – आगामी लोकसभा निवडणूक जवळ आल्याने आता शिवसेना-भाजप युतीचा प्रश्न सुटला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर आता मुंबईतील पत्रकार परिषदमध्ये युतीबाबतची घोषणा केली. त्यानंतर आता विरोधी पक्षांकडून भाजप-शिवसेना युतीबाबत टीका करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप-शिवसेना युतीवर कविते करत टीका केली आहे.

शिवसेना-भाजप युतीवरील कविता :

ती पाहताच कमळा 
विसरलो आम्ही स्वबळा

गडया खुर्ची टिकवण्या
तुझ्या गळा माझ्या गळा..

तसेच यापूर्वी शिवसेना आणि भाजप यांनी युतीवरून एकमेकांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांचा एक व्हिडीओ देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेअर करण्यात आला आहे.

 

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)