विरोधकांच्या सभाचे चित्रीकरण म्हणजे दडपशाही – जयंत पाटील

खेड – राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने परिवर्तण यात्रेला कालपासून सुरूवात केली आहे. या यात्रेतून भाजपाला वेठीस धरण्यास प्रयत्न राष्ट्रवादी करत आहे. पक्षांचे नेते भाजपावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. परिवर्तन यात्रा सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे आहे.

परिवर्तन यात्रेत आज खेड येथील सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत आर. पाटील हे सभेत बोलत होते. त्यावेळी पोलिस कर्मचारी चित्रीकरण करत होते. त्यावेळी जयंत पाटील सरकारवर निशाणा साधत म्हणाले की, “ही काही निवडणुकीची सभा नाही, येथे आचारसंहिता नाही. कुणाच्या आदेशावरून जर पोलिस विरोधकांच्या सभांचे चित्रीकरण करत असतील तर ही दडपशाही आहे”.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

परिवर्तण यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे नेते भाजप-शिवसेना सरकारवर हल्लाबोल करत आहेत.  प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, विधिमंडळ नेते आ. अजित पवार, ज्येष्ठ नेते आ. छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, ज्येष्ठ नेते सुनील तटकरे, महिला अध्यक्ष चित्रा वाघ आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते या यात्रेत सहभागी असून या दरम्यान सरकारवर टीका करण्याची एकही संधी ते साेडत नाहीत.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)