राष्ट्रवादीच्या पक्षनिरीक्षकपदी राजेंद्र कोठारी

जामखेड : सध्या चालू असलेल्या नगर महापालिका निवडणूक व आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने नगर शहर व अकोले विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून जामखेडचे राजेंद्र कोठारी यांची नियुक्ती केली आहे.

सदर नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी नुकतेच कोठारी यांना दिले. सदर नियुक्ती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. यापूर्वीही पक्षाने पारनेर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. त्याचसोबत आता नगर व अकोले मतदारसंघाची नवी जबाबदारी पक्षाने सोपवली असल्यामुळे, तसेच प्रदेश सरचिटणीस पदाचीही जबाबदारी त्यांच्याकडे असल्यामुळे पक्षसंघटनेत त्यांचे वजन वाढल्याचे मानले जात आहे.

-Ads-

पक्षाने सोपविलेल्या तिनही विधानसभा मतदारसंघात पक्षाचे संघटन वाढवून व मजबूत करुन येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला नेत्रदीपक यश मिळवून देऊ असा विश्वास कोठारी यांनी यासंदर्भात व्यक्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)