नवाब मलिकांकडून अण्णा हजारे यांची लेखी माफी

पुणे – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राणेगणसिध्दी येथे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अण्णा हजारेंवर पैसे घेऊन उषोषणे करतात अशी टीका एका चॅनेलवर केली होती. याप्रकरणी नवाब मलिक यांनी अण्णा हजारे यांची लेखी माफी मागितली आहे.

आपण वडीलधारी व्यक्ती असून आपले मन दुखावल्याने मी दिलगिरी व्यक्त करतो असे लेखी उत्तर नवाब मलिक यांनी अण्णा हजारे यांना पाठवले आहे. तर अण्णांनीही प्रत्युत्तर देत यावर आपल्याला देखील पुढे या प्रकरणी कोणताही वाद वाढवयाचा नाही, असे म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हजारे यांची नवाब मलिक यांना नोटीस

दरम्यान, माजी मंत्री नबाब मलिक यांनी एका चॅनेलवर चक्क खोटा आरोप करताना अण्णांनी संघाच्या शाखेत दहा वर्षे प्रशिक्षण घेऊन त्यानंतर सामाजिक काम सुरू केल्याचे सांगितले होते. त्यानंतर अण्णांनी मलिक यांना 2 फेब्रुवारी रोजी अॅड. मिलिंद पवार यांच्यावतीने कायदेशीर नोटीस पाठवली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)