‘शदर पवार’ यांच्या विधानावर नाराज होऊन ‘तारीक अन्वर’ यांचा पक्षाला रामराम

लोकसभेतल्या खासदारकीचा दिला राजीनामा

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव ‘तारीक अन्वर’ यांनी लोकसभेतल्या खासदारकीचा आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी त्यांनी आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी तुम्ही कोणत्या पक्षात जाणार असा प्रश्न विचारले असता, ते म्हणाले ‘काही वेळ प्रतीक्षा करा’. राफेल करारावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ  केलेल्या विधानावर नाराज होऊन त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले आहे.

तारिक अन्वर हे राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक सदस्य होते. बिहारमधल्या कटिहारमधून राष्ट्रवादीतर्फे तारिक अन्वर हे लोकसभेत खासदार आहेत.

काय म्हटले होते शरद पवार

राफेल करारावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट दिली होती. तसेच मोदींच्या हेतूवर जनतेला संशय नसल्याचं ते म्हणाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)