दबावाचा वापर करून राष्ट्रवादीचे उमेदवार फोडले

आघाडीकडून व्यक्‍तिगत टीका होणार नाही- अंकुश काकडे

प्रभाग 10 मध्ये राष्ट्रवादीचा अर्ज राहून गेला

आघाडी असताना प्रभाग 10 मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकमेकांविरोधात लढत आहे, असा प्रश्‍न काकडे यांना विचारला असता, त्याचा आघाडीवर काही परिणाम होणार नाही, असे काकडे म्हणाले. तर तेथे अर्ज राहून गेला असल्याचे आ. संग्राम जगताप यांनी सांगितले.

नगर – सरकारचा व पोलीस यंत्रणेचा दबाव वापरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार फोडले, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निरीक्षक अॅड.अंकुश काकडे यांनी नाव न घेता भाजपवर केला.चार वर्षांपासून राज्यात भाजप-शिवसनेचे सरकार आहे. या काळात भाजपने शहरात कोणता प्रकल्प आणला. उड्डाणपुलाची फक्त घोषणा केली, कार्यवाही मात्र शून्य आहे. निवडणुकीत पोकळ घोषणा करण्याची त्यांना सवय आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

कॉंग्रेस,राष्ट्रवादी,भाकप व रिपब्लिकन युनाटेड आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज करण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काकडे बोलत होते. यावेळी आ. अरूण जगताप, आ. संग्राम जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, दादाभाऊ कळमकर, डॉ. सुजय विखे, प्रा. माणिकराव विधाते, अशाके गायकवाड आदी उपस्थित होते.

शिवसेनेच्या आरोपत तथ्य नाही

राष्ट्रवादी व भाजपची छुपी युती असल्याचा शिवसेनेचा आरोप जुनाच आहे. राज्य सरकारसंदर्भातही असाच आरोप केला गेला आहे. त्यामुळे त्यात काहीच तथ्य नाही, असे काकडे यांनी सांगितले.

काकडे म्हणाले, महापालिकेच्या सत्तेतील पहिल्या अडीच वर्षात आघाडीने शहरात विकासकामे केली. नंतरच्या अडीच वर्षात त्यांनी काहीच कामे केली नाहीत. त्यांच्यात फक्त वादावादी सुरू आहे.

केडगाव घटनेचा काही राजकीय पक्षांनी व्यक्‍तीगत फायद्यासाठी खालच्या पातळीवर जावून प्रचार केला. त्यासाठी सत्तेचा वापर केला. राजकारण निवडणुकीपुरते असावे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे शल्य त्यांना अजूनही आहे. आघाडी विकासाच्या मुद्यावर निवडणुकीला सामोरे जात आहे. आघाडीकडून व्यक्‍तीगत टीका केली जाणार नाही.प्रचाराची पातळीखाली जाणार नाही, याची सूचना उमेदवारांना केली आहे, असेही ते म्हणाले.

केडगावकर सुज्ञ असून निवडणुकीत ते आघाडीला साथ देतील, असे काकडे म्हणाले. प्रभाग 5 सोयीचा नसल्याने या प्रभागात राष्ट्रवादीने उमेदवार दिला नसल्याचे कळमकर म्हणाले.

“दीप चव्हाण यांनी दिला राजीनामा’

कॉंग्रेसने केडगावात अवघ्या तीन तासांत उमेदवार दिले आहेत. सात जागांवर कॉंग्रेसने उमेदवार दिले असून एका जागेवर अपक्षाला पुरस्कृत केले आहे. केडगावात कॉंग्रेसला किमान 4 जागा मिळतील, असा दावा डॉ. सुजय विखे यांनी केला. दीप चव्हाण यांच्या शहर जिल्हाध्यक्षपदाबाबत बोलताना ते आता माजी झाले आहे. त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे विखे म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)